भूमिअभिलेख विभागात दीड हजार खासगी भूमापकांची होणार भरती – Bhumi Abhilekh Bhukarmapak Bharti

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

Bhumi Abhilekh Bhukarmapak Bharti – One of the biggest hurdles for citizens in Maharashtra has been the delay in processing land survey and measurement requests. To tackle this, the state government previously authorized the appointment of trained, licensed surveyors and private surveying agencies in every district. With this new recruitment drive, the Bhumi Abhilekh department has set an ambitious target: resolving all fresh land measurement applications within just one month once the new workforce is deployed.

Bhumi Abhilekh Bhukarmapak Bharti  – राज्यातील मोजणी जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आता राज्यभरात एकवट वेतनांवर दीड हजार खासगी भूमापक नेण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. खासगी भूमापकाची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांनतर प्रत्यक्ष काम देण्यास तीन महिन्यांचा कालवधी लागणार आहे. तीन महिन्यांनंतर एक महिन्यात मोजणी अर्ज निकाली काढण्याचे उदिष्ट विभागाने ठेवले आहे. जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद पद्धतीने व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात एका एजन्सीमार्फत पन्नास भूमापकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु पुणे शहर व जिल्ह्यातील मोजणी प्रलंबित अर्जाची संख्या विचारात घेता खासगी भूमापकांची संख्या वाढविण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामध्ये आणखी चाळीस खासगी भूमापक घेण्यात येणार आहे. त्यामुळे भूमापकांची संख्या दोनशेहून अधिक होणार आहे. त्यापुढे पाऊल टाकत राज्यभरात दीड हजार खासगी भूमापक नेमण्यात येणार आहेत.

Bhumi Abhilekh Bhukarmapak Bharti

छोट्या जिल्ह्यात पन्नास, तर मोठ्या जिल्ह्यांना शंभर अशा प्रकारे एक हजार भूमापकांची नेमणूक केली जाणार आहे. एकवट मानधनावर त्यांच्या नेमणुका केल्या जाणार असल्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. शैलेश नवाल यांनी सांगितले. त्यांची नियुक्ती करणे, त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रामध्ये त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष त्यांना काम दिले जाणार आहे. त्यास किमान ३ महिन्यांचा कालवधी लागणार आहे.

Leave a Comment