ZP School Teacher Bharti Process – Good News for job Seekers!! – A massive recruitment drive has been approved to fill 418 assistant teacher vacancies in Nagpur District Zilla Parishad (ZP) primary and upper primary schools, addressing the severe staff crunch that has impacted the quality of rural education. According to the official roster finalized on January 1, 2026, there are 523 vacant assistant teacher positions in the district, and the government has permitted filling 80% of these posts. The entire hiring process will be conducted transparently through the centralized online ‘PAVITRA Portal’, bringing long-awaited relief to thousands of unemployed D.Ed. and B.Ed. graduates under ZP School Teacher Bharti Process. Although administrative hurdles and roster adjustments have delayed the advertisement deadline five times in the past (including dates in May, June, and July), the education department aims to publish the official notification next week and wrap up the entire application verification and merit list process within a month. This recruitment, along with the recent completion of adjusting 75 surplus teachers into active schools, is expected to ease the workload on existing staff—who are often burdened with non-educational government duties—and significantly revive the academic standard of ZP schools.
ZP School Teacher Bharti Process – भावी शिक्षण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. अपुऱ्या सोयी-सुविधा, प्रशासकीय अनास्था आणि प्रामुख्याने शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या सातत्याने घटत असून, अनेक शाळा अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने अखेर एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ४१८ साहाय्यक शिक्षकांच्या पदभरतीला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या अधिकृत बिंदुनामावलीनुसार (रोस्टर), संपूर्ण जिल्ह्यात साहाय्यक शिक्षकांची एकूण ५२३ पदे रिक्त असल्याचे समोर आले होते. शासनाच्या नवीन धोरणानुसार, या एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के म्हणजेच ४१८ जागांवर तातडीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाच्या केंद्रीयकृत ‘पवित्र पोर्टल’ (PAVITRA Portal) या ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे डी.एड. (D.Ed.) आणि बी.एड. (B.Ed.) पदविका व पदवी धारण केलेले हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत होते. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या सर्व उमेदवारांमध्ये आशेचे किरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील शालेय प्रशासनाला देखील नवीन ऊर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षक भरतीची ही प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर अत्यंत वेगाने सुरू असली, तरी तांत्रिक आणि आरक्षणाच्या पेचामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्यास वारंवार विलंब होत असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने आरक्षणनिहाय जागांचा सविस्तर मसुदा आणि जाहिरात तयार करून अंतिम मंजुरीसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठवली आहे. मात्र, बिंदुनामावली निश्चित करताना येणाऱ्या कायदेशीर व तांत्रिक अडचणींमुळे भरतीचा मुहूर्त तब्बल पाच वेळा पुढे ढकलावा लागला आहे. तसेच या मुळे, यापूर्वी ३१ मे, १५ मे, १५ जून, ३० जून आणि अगदी अलीकडे १० जुलै अशी संभाव्य तारीख बदलण्यात आली होती. परंतु, आता शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिरातीच्या अंतिम मसुद्याला येत्या काही दिवसांतच शिक्षण आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता असून, पुढील आठवड्यातच अधिकृत जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व पदे ही ‘साहाय्यक शिक्षक’ या संवर्गातील असून, निवड झालेल्या शिक्षकांना थेट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज मागवण्यापासून ते उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी (Merit List) तयार करणे आणि अंतिम नियुक्ती आदेश देणे, ही संपूर्ण क्लिष्ट प्रक्रिया अवघ्या महिनाभराच्या आत पूर्ण करण्याचे कडक नियोजन नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आखले आहे. यामुळे उमेदवारांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही आणि नव्या शैक्षणिक वर्षात शाळांना पूर्णवेळ शिक्षक मिळतील. निश्चितच विद्यार्थी सुद्धा या निर्णय मुले खुश आहेत.
या मेगाभरतीमुळे केवळ बेरोजगार तरुणांनाच रोजगार मिळणार नाही, तर ग्रामीण भागातील शालेय शिक्षण पद्धतीला सोसवे लागणारे अनेक गंभीर चटके देखील कमी होणार आहेत. सध्या नागपूर जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कामाचा प्रचंड अतिरिक्त ताण पडत आहे. एकाच शिक्षकाला एकाच वेळी दोन ते तीन वर्गांमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे धडे द्यावे लागत आहेत, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार पालकांकडून वारंवार केली जात होती. त्यातच भर म्हणून शिक्षकांना जनगणना, निवडणूक कर्तव्ये, आणि विविध शासकीय सर्वेक्षणे (जसे की एसआयआर सारखी कामे) यांसारख्या अशैक्षणिक कामांमध्ये जुंपले जात असल्याने, त्यांचे मूळ अध्यापनाचे काम बाजूला पडत होते. या सर्व पार्श्वभूमीवर ४१८ नवीन शिक्षकांची भरती ग्रामीण भागातील शाळांचे रूप पालटणारी ठरू शकते. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या ७५ शिक्षकांच्या समायोजनाची (Adjustment) प्रक्रिया जी विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती, ती आता पूर्ण झाली आहे. शिक्षण विभागाने या शिक्षकांचे समायोजन आदेश जारी केले असून, बहुतांश शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजूही झाले आहेत. रिक्त पदांची भरती आणि अतिरिक्त शिक्षकांचे योग्य समायोजन या दुहेरी धोरणामुळे नागपूर जिल्ह्यातील शासकीय शाळांमधील शैक्षणिक वातावरण सुधारेल आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा दर्जेदार व हक्काचे शिक्षण मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.