Maha TET 2026 New Exam Date – A major update has emerged regarding the Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET), sparking anxiety among lakhs of candidates who are demanding the immediate announcement of rescheduled dates. Following the recent cancellation of the exam due to a paper leak, which affected over 6.12 lakh students, the State Council of Examination held an emergency meeting on Sunday to discuss the path forward. As part of the immediate aftermath, officials have already recalled approximately six lakh blank answer sheets from 37 district planning centers across the state, halting all ongoing processes that were set in motion just hours before the initial cancellation.
While the 2.26 lakh registered teachers await clarity on the Maha TET 2026 New Exam Date, official sources indicate that conducting the re-examination before August is highly unlikely. The council requires a minimum of two months to complete the rigorous logistical preparations, which include drafting new confidential question papers, maintaining absolute secrecy during printing, and coordinating available exam centers. Furthermore, authorities must meticulously evaluate external factors such as the ongoing monsoon season and existing schedules of other major competitive exams before finalizing the official date, making a quick resolution nearly impossible for frustrated aspirants.
Maha TET 2026 Exam Date New Exam Date – महाराष्ट्र TET (New Exam Date 2026) परीक्षेबद्दल एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. सध्या उमेदवारां मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उमेदवारांची मागणी आहे कि हि परीक्षा त्वरित राबविण्यात यावी आणि नवीन तारील त्वरित घोषित करावी. परंतु , राज्य परीक्षा परिषदेने ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ रद्द केल्यानंतर रविवारी राज्यातील सर्व जिल्हास्तरावरून कोऱ्या सुमारे सहा लाख उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्याच्या तयारीसाठी परिषदेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले. परीक्षा लांबणार असल्याने परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख २६ हजार शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. पेपरफुटीचा रद्द करण्यात आली. राज्यातील सहा लाख १२५ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. पेपरफुटीनंतर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. परीक्षा पुन्हा घेण्यासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे अधिकारीसूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या काही तास आधी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर परीक्षेचे साहित्य पोहचले, परीक्षा कक्षात बैठक क्रमांकही लिहण्यात आले होते. पेपर रद्दची माहिती मिळाल्यानंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा पेपर घेण्यासाठीची तयारी करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात येते. नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाईबाबत गोपनीयता राखणे यासह नवीन तारखेचे नियोजन, त्यादरम्यान इतर परीक्षा नसणे हे पाहणे, परीक्षा केंद्रांची उपलब्धता, पाऊस या सर्व गोष्टींचा अभ्यास करून परीक्षेची तारीख ठरवावी लागणार असल्याने हा कालावधी लागेल असे सांगण्यात येते. दरम्यान, रविवारी परिषदेने राज्यातील ३७ परीक्षा जिल्हा नियोजन केंद्रांवरून सर्व उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या.

राज्यातील महाटीईटी परीक्षेला सहा लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये शिक्षकांची नोंदणी लक्षणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२८पर्यंत टीईटी उत्तीर्णतेची मुदत दिल्याने यंदा परीक्षेला शिक्षकांनी विक्रमी नोंद केली. सहा लाखांमध्ये शिक्षकांचे ३ लाख ४६ हजार अर्ज आहेत. दोन लाख २६ हजार शिक्षकांचे हे अर्ज असून, यात ‘पेपर-१’च्या तुलनेत ‘पेपर-२’साठी सर्वाधिक अर्ज आहेत. परिषदेने उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या आहेत. परंतु जिल्हा ट्रेझरीमध्ये जमा असलेल्या प्रश्नपत्रिका संचाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘महाटीईटी’ परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद आहेत. परीक्षा नियोजनासाठी सुमारे परिषदेला सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च लागतो. पुन्हा परीक्षा होणार असल्याने खर्चाचा भुर्दंड परिषदेला बसणार असल्याचीही चर्चा आहे. परीक्षा नियोजनाची तयारी परिषदेकडून झाली होती. परीक्षा केंद्रावर ‘सीसीटीव्ही’सह विद्यार्थ्यांची तपासणीसाठीची यंत्रणा पोहचली होती. यासह प्रश्नपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठीचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात येते.