महत्वाचे!- अखेर प्राध्यापक भरती प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, नवीन अपडेट जाहीर – Pradhyapak Bharti 2026 Maharashtra
मित्रांनो, प्राध्यापक भरती संदर्भातील पेंडिंग प्रक्रिया आता पार पासून पुढील टप्यात सरकली आहे. या मुले महाराष्ट्रातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यातच एक नवीन अपडेट म्हणजे महाराष्ट्रातील नावाजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक प्रवर्गातील भरती प्रक्रिया विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. तसेच कुलसचिवपदासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक सोमवारी (दि. २५) सकाळी घेण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्यासह १५ सदस्य बैठकीत सहभागी झाले. ऑनलाइन व ऑफलाइन (हायब्रिड मोड) पद्धतीने सदर बैठक पार पडली. बैठकीत दोन विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषद सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षक संवर्गाच्या नियोजित मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्या आता २६ जून २०२६ नंतर घेतल्या जाणार आहेत.

या मुलाखतींमध्ये विधी, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतिशास्त्र, इतिहास, इंग्रजी आणि हिंदी विभागातील प्राध्यापक वर्गातील एकूण आठ पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पदांसाठी ५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली. तसेच सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक वर्गातील ६५ जागांसाठीही दाखल झालेल्या सुमारे साडेतीन हजार आयोजनातून छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे.