MPSC द्वारे लिपिक, टंकलेखक आणि अन्य 2,619 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित! – MPSC Lipik tank lekhak Bharti

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC Lipik tank lekhak Bharti – Great news has emerged for candidates seeking government job opportunities in Maharashtra. The Maharashtra Public Service Commission has officially released the advertisement for the Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2026 to fill a total of 2,619 vacancies. This recruitment drive presents a massive golden opportunity, especially for aspirants eyeing the MPSC Clerk Typist Bharti 2026, which leads the drive with an impressive 1,864 posts. In addition to these, the process includes 461 vacancies for Assistant Motor Vehicle Inspector (Group C), 282 for Tax Assistant, 9 for Industry Inspector, and 3 for Technical Assistant. For the first time, this preliminary examination will be conducted as a Computer-Based Test (CBT) online. Eligible candidates can submit their online applications from June 27 to July 17, 2026, via the official portal, while the last date to fill out the form details is July 13. The absolute deadline for online fee payment is July 17, and payments via SBI challan can be completed up to July 20, 2026. MPSC has further notified that the dates for the Main Examination will be announced separately for the candidates who qualify based on their preliminary exam results.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठ्ठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे २ हजार ६१९ पदांची भरती करण्यात येणार असून, उमेदवारांना २७ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.  हि नोकरीची एक मोठ्ठी सुवर्णसंधी आहे. तसेच ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने CBT) घेतली जाणार आहे. एमपीएससीने या बाबतची माहिती दिली. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६च्या माध्यमातून उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या तीन जागा, कर सहायक पदाच्या २८२ जागा, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या ४६१ जागा, तर लिपिक-टंकलेखक पदाच्या १ हजार ८६४ जागांसाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २७ जून ते १३ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने १७ जुलैपर्यंत, तर चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जुलै ही अंतिम मुदत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती MPSC द्वारे दिली आहे.

MPSC Mega Bharti 2026 Group C Lipik

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल करण्याची शक्यता आहे. परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनाकांपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे, संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. त्यानुसार सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याआधारे परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांंसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

  • पदाचे नाव –  उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या –  2619 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – 19 – 38  वर्षे
  • अर्ज शुल्क – 
    • खुला वर्ग –  रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ जून २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १७ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे २ हजार ६१९ पदांची भरती करण्यात येणार असून, उमेदवारांना २७ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (ऑनलाइन) घेतली जाणार आहे.

एमपीएससीने या बाबतची माहिती दिली. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६च्या माध्यमातून उद्योग निरीक्षक पदाच्या ९ जागा, तांत्रिक सहायक पदाच्या तीन जागा, कर सहायक पदाच्या २८२ जागा, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या ४६१ जागा, तर लिपिक-टंकलेखक पदाच्या १ हजार ८६४ जागांसाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २७ जून ते १३ जुलै या कालावधीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने १७ जुलैपर्यंत, तर चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जुलै ही अंतिम मुदत आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली.

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल करण्याची शक्यता आहे. परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनाकांपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे, संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. त्यानुसार सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याआधारे परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांंसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, तसेच पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीमघ्ये नमूद संवर्गासाठी, सामाजिक, समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची, विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल, वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. त्यामुळे पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे किंवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची, निवडीची संधी वाया गेल्याची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

Leave a Comment