कामगार विभागात निरीक्षक, लघुलेखक, अन्य “गट क” पदांची 78 जागांसाठी भरती जाहीर २०२६ – Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026 – Maharashtra Kamgar ayuktalay Bharti 2026 @ mahakamgar.maharashtra.gov.inThe Commissionerate of Labour, Mumbai—operating under the Labour Department of the Government of Maharashtra—has published an advertisement to fill vacant posts within the ‘Group-C’ category. This recruitment process will be conducted via the direct recruitment method, and applications will be accepted exclusively through online channels for Maharashtra Kamgar Vibhag Recruitment 2026 Application Forms. The vacancies primarily comprise positions within the establishment of the Office of the Labour Commissioner, various Security Guard Boards, and the Maharashtra Mathadi, Hamal, and Other Manual Workers Boards. Friends, this recruitment drive aims to fill three primary types of positions. The first position is that of ‘Inspector,’ carrying a pay scale ranging from ₹35,400 to ₹1,12,400, in addition to Dearness Allowance and other allowances admissible as per regulations; a total of 62 vacancies are available for this post. The second position is that of ‘Accountant,’ which also carries a pay scale ranging from ₹35,400 to ₹1,12,400; there are 12 vacancies available for this post. The third position is that of ‘Stenographer,’ featuring a pay scale ranging from ₹25,500 to ₹81,100, along with other allowances; 04 vacancies are to be filled for this post. The application submission process commenced on May 13, 2026 for Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026.

 

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या कामगार आयुक्तालय, मुंबई यांनी ‘गट-क’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राबवली जाणार असून, यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. यामध्ये प्रामुख्याने कामगार आयुक्त कार्यालय, विविध सुरक्षा रक्षक मंडळे आणि महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळे यांच्या आस्थापनेवरील पदांचा समावेश आहे. मित्रांनो, या भरतीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची पदे भरली जाणार आहेत. पहिले पद ‘निरीक्षक’ (Inspector) असून यासाठी वेतन श्रेणी ३५,४०० ते १,१२,४०० रुपये अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते अशी आहे, यासाठी एकूण ६२ पदे रिक्त आहेत. दुसरे पद ‘लेखापाल’ (Accountant) असून याची वेतन श्रेणी देखील ३५,४०० ते १,१२,४०० रुपये  हे आणि यासाठी १२ पदे उपलब्ध आहेत. तिसरे पद ‘लघुलेखक’ (Stenographer) असून यासाठी वेतन श्रेणी २५,५०० ते ८१,१०० रुपये आणि इतर भत्ते असून यासाठी ०४ पदे भरली जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ मे २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ११ जून २०२६ रोजी रात्री २३:५५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच, परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी १२ जून २०२६ रोजी रात्री २३:५५ वाजेपर्यंतची अंतिम वेळ निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारांना अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. जर एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छित असेल, तर त्याला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असेल. सविस्तर जाहिरात आणि अर्जासाठी https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026

Kamgar Ayuktalay Bharti 2026 Education Qualifications 

शैक्षणिक अर्हता:

  • निरीक्षक (गट-क): या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीशी समतुल्य म्हणून मान्य केलेली कोणतीही अर्हता असणे आवश्यक आहे.
  • लेखापाल (गट-क): उमेदवाराकडे वाणिज्य शाखेतील (Commerce) पदवी असावी. तसेच, लेखा क्षेत्रात (Accountancy) काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • लघुलेखक (गट-क): या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य मानलेली अर्हता असणे आवश्यक आहे. याशिवाय, सर्व पदांसाठी उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.

टंकलेखन अर्हता (लघुलेखक पदासाठी):
लघुलेखक पदासाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच विशिष्ट तांत्रिक अर्हता आवश्यक आहे. यामध्ये इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. तसेच, मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC-TBC) असणे आवश्यक आहे.

कामगार आयुक्तालय भरती २०२६ अंतर्गत विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, वयाची गणना ११ जून २०२६ या दिनांकावर आधारित केली जाईल. ‘निरीक्षक’, ‘लेखापाल’ आणि ‘लघुलेखक’ या तिन्ही पदांसाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादेबाबत विविध प्रवर्गांसाठी खालीलप्रमाणे सवलती देण्यात आल्या आहेत:

  • अमागास (Open): सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे.
  • मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. (EWS): या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
  • विशेष सवलती: प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे, तर दिव्यांग (Handicapped) आणि प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी ती ४५ वर्षांपर्यंत असेल. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • माजी सैनिक व माथाडी कामगार: माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी तसेच सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत कामगारांसाठी त्यांच्या सेवा कालावधीनुसार ३ वर्षे अतिरिक्त सवलत दिली जाईल.

न्यायालयीन प्रकरणाचा संदर्भ देऊन असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार काही विशिष्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबतीत वयोमर्यादा शिथिल केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

परीक्षा शुल्काचा तपशील: – कामगार आयुक्तालय भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचे शुल्क प्रवर्गांनुसार खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

  • अमागास (Open): १,००० रुपये.
  • मागासवर्गीय/आ.दु.घ. (EWS)/अनाथ: ९०० रुपये.

उपरोक्त शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील कर अतिरिक्त असतील. हे शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे असून ते ‘ना-परतावा’ (Non-refundable) आहे. जर उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असेल, तर त्याला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क भरणे अनिवार्य आहे.

 

Important Links For Kamgar Ayuktalay Bharti 2026

📑 PDF जाहिरातhttps://lnk.ua/PDQIpU8WM
👉 ऑनलाईन अर्ज करा  mahakamgar.maharashtra.gov.inhttps://lnk.ua/7wMjS111S
✅ अधिकृत वेबसाईट labour.gov.in

Leave a Comment