Maharashtra Anganwadi Bharti 2026 – महिला उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी संधी समोर आली आहे. ती पण तुमच्या गावात किंवा शहरातच!! एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सांगली अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महिलांसाठी हि नोकरीच म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. या पदाच्या मुख्य कार्य प्रोफाइलचा (Work Profile) विचार केला तर, निवड झालेल्या अंगणवाडी मदतनिसांना स्थानिक अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकेच्या मार्गदर्शनाखाली बालकांची काळजी घेण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. यामध्ये अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांची स्वच्छता राखणे, त्यांना वेळेवर पोषण आहार देणे, केंद्रामध्ये शिस्त व आल्हाददायक वातावरण ठेवणे, आणि बालकांच्या पूर्व-प्राथमिक शिक्षणात सेविकेला सर्वतोपरी मदत करणे अशा दैनंदिन कामांचा समावेश असतो. ग्रामीण व नागरी भागातील बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास सुदृढ व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य काम या पदाच्या माध्यमातून केले जाते. सांगली जिल्ह्यातील नागरी भागातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुपोषण मुक्तीच्या मोहिमेत थेट योगदान देण्याची ही एक सुवर्णसंधी असून, नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण सांगली हेच असणार आहे. तस अन्य जिल्ह्यात सुद्धा जागा निघणारच आहेत. \त्या बद्दल माहिती आम्ही या व्हाट्सअँप चॅनल वर प्रकाशित करत असतो तेव्हा जॉईन करून ठेवा.
आता बघूया या नोकरी अंतर्गत आपले जॉब प्रोफाइल काय असणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper) हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे मानले जाते. या पदावर कार्यरत असलेल्या महिला उमेदवारांना प्रामुख्याने अंगणवाडी सेविकेच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या संगोपनाची आणि केंद्राच्या व्यवस्थापनाची दैनंदिन कामे करावी लागतात. त्यांच्या मुख्य कर्तव्यांमध्ये अंगणवाडी केंद्र वेळेवर उघडणे, केंद्राची संपूर्ण स्वच्छता राखणे आणि तेथील वातावरण बालकांसाठी सुरक्षित व आल्हाददायक ठेवणे समाविष्ट आहे. याशिवाय, अंगणवाडीत येणाऱ्या ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना, तसेच गरोदर व स्तनदा मातांना दिला जाणारा शासकीय पोषण आहार (टीएचआर किंवा शिजवलेला ताजा आहार) वेळेवर आणि स्वच्छतेने तयार करून त्याचे वाटप करणे ही मदतनिसांची मुख्य जबाबदारी असते. त्याचप्रमाणे, अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या लहान मुलांना घरापासून सुरक्षितपणे केंद्रात आणणे आणि सुट्टी झाल्यानंतर पालकांच्या स्वाधीन करणे हे कामही मदतनिसांना करावे लागते. बालकांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे (जसे की हात धुणे, नखे काढणे) लक्ष देणे, त्यांना खेळकर वातावरणात पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी तयार करणे आणि सेविकेला दैनंदिन नोंदी किंवा गृहभेटींच्या कामात सर्वतोपरी मदत करणे ही त्यांची अतिरिक्त कर्तव्ये असतात. थोडक्यात सांगायचे तर, ग्रामीण आणि नागरी भागातील कुपोषण निर्मूलन, बालकांचा शारीरिक-मानसिक विकास आणि शासकीय आरोग्य योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात अंगणवाडी मदतनिसांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.

चला आता शैक्षणिक पत्रे बद्दल पूर्ण माहिती बघ्या. म्हणजे आपल्या अर्ज करणे एकदम सोपे जाईल. या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता निकष अत्यंत स्पष्ट करण्यात आले असून, अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाची किमान १२ वी उत्तीर्ण (किमान माध्यमिक व उच्च माध्यमिक) पात्रता असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे; तथापि, सामाजिक बांधिलकी म्हणून विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत शिथिलता देऊन ती ४० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या भरतीतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ‘स्थानिक रहिवासी’ असणे होय, ज्यानुसार अर्जदार महिला ही संबंधित नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायत कार्यक्षेत्रातीलच स्थानिक रहिवाशी असणे सक्तीचे आहे. याशिवाय, शासनाच्या नियमानुसार उमेदवाराला ‘लहान कुटुंबाची अट’ लागू राहील, ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये असणे आवश्यक असून त्याबाबतचे अधिकृत प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. भाषेच्या ज्ञानाबाबत विशेष तरतूद असून, जर संबंधित केंद्रात ५०% पेक्षा जास्त मुले मराठीव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील, तर उमेदवाराला त्या भाषेचे लिहिता-वाचता येण्याइतके ज्ञान असणे आवश्यक आहे, पण अशा उमेदवाराने १०वी, १२वी किंवा उच्च शिक्षणात किमान एक विषय मराठी घेऊन उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
आता अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवारांनी या भरतीसाठी पूर्णपणे ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, कारण ऑनलाईन अर्जाचा कोणताही पर्याय येथे उपलब्ध नाही. उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जाची प्रत व्यवस्थित भरून, त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित (Attested) केलेल्या छायांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे. अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा नावातील बदलाबाबतचे कायदेशीर शपथपत्र, तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे अत्यंत आवश्यक आहे. हा परिपूर्ण भरलेला अर्ज ‘बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जिल्हा सांगली’ यांच्या अधिकृत कार्यालयात स्वतः किंवा टपालाद्वारे जमा करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://sangli.nic.in/ वर जाऊन मूळ जाहिरात सविस्तर वाचावी आणि वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
3 thoughts on “१२ वी पास महिलांसाठी अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – Maharashtra Anganwadi Bharti”
Needful this job
Acha lga ❤️
❤️