BAMU Bharti 2026 – A major update has emerged regarding recruitment at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU Bharti 2026 Recruitment Process for 116 Vacancies). This presents a significant job opportunity for aspiring candidates to work within the prestigious university system. A total of 116 positions are being filled through a selection process involving written exams and direct interviews. Online Application Form Link is given below.
BAMU मराठवाडा विद्यालयाच्या भरती संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. BAMU विद्यालयात नोकरीची हि एक महत्वाची संधी आहे. सरळ मुलाखती द्वारे उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. या अंतर्गत तब्बल ११६ पदे भरण्यात येणार आहे. प्राप्त माहिती नुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ३८ विभागात शिक्षकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत. ३० जून ते १५ जुलै या काळात ऑनलाईन आवेदन मागविण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा. मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ शासन मान्य पदे असून १६० पदे सध्या रिक्त आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकप्रवर्गातील ७३ पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तथापि रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने एकत्रित वेतनावरी पदे भरण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. मा. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात एकत्रितवेतनावर शिक्षकांची ११ महिन्यासाठी भरती करण्यात आली. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एकत्रित वेतनावर सहायक प्राध्यापकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ३० विभाग, धाराशिव उपपरिसर येथील ७ विभाग व दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र अशा ३८ विभागात मिळून ११६ पदे भरण्यात येणार आहेत. ११ महिन्यासाठी भरण्यात येणा-या या शिक्षकांना ३२ हजार रूपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदन मागविण्यात आले असून यांची लिंक विद्यीपठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ३० जून ते १५ जुलै या काळात उमेदवारांना ऑनलाईन आवेदन दाखल करता येणार आहेत. तर २० जुलै पर्यंत कागदपत्रांसह दोन प्रतीत अस्थापना विभागात संबंधित उमेदवारांनी आवेदनाची ‘हॉर्डकॉपी’ पाठवावी. यानंतर लेखी परीक्षेची तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.
Important Links For bamu.ac.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/4in0a |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.bamu.ac.in |