PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar – The highly anticipated 22nd installment of the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM Kisan Yojana Hafta Date) scheme was directly deposited into farmers’ bank accounts on March 13, 2026. A total of 173,525 farmers in the Nagpur district benefited from this initiative, with funds amounting to ₹35.20 crore being credited to their accounts. During the release of previous installments, there had been a significant decline in the number of beneficiaries due to incomplete e-KYC procedures, unlinked bank accounts (not linked to Aadhaar), or various technical glitches. However, following appeals issued by the administration, many farmers completed the necessary documentation and rectified the errors. Consequently, the number of beneficiaries has rebounded this time around, ensuring that a large number of farmers have received the intended benefits. This financial assistance has provided substantial support to farmers as the Rabi season draws to a close. The answer to PM Kisan Yojana Hafta Kadhi Yenar or PM Kisan Yojana Payment Date, pm kisan yojana bank status is that, its already on the way, & you gate this in this Month around 25th March 2026.
पंतप्रधान किसान सन्माना निधी योजनेचा बहुप्रतीक्षित २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ५२५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. त्यांच्या खात्यात ३५ कोटी २० लाखांचा निधी जमा झाला. मागील काही हप्त्यांच्या वेळी ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थीच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, प्रशासनाच्या आवाहनानंतर अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि त्रुटींमध्ये दुरुस्ती करून घेतली. परिणामी, यावेळी लाभार्थीच्या संख्येत सुधारणा झाली असून, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या आर्थिक मदतीमुळे रब्बी हंगामाच्या शेवटी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख योजना आहे. याद्वारे पात्र शेतकऱ्याना दरवर्षी ६,००० रुपयांचे अतिरिक्त आर्थिक साहाय्य मिळते. हे साहाय्य प्रधानमंत्री किसान सन्मान निधी २ योजनेच्या ६००० रुपयांव्यतिरिक्त आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना १२,००० रुपयांचा वार्षिक लाभ मिळत आहे. या अर्थसाहाय्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. ई-केवायसी न केल्याचा लाभार्थ्यांना फटका – ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना २२ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे केवायसी अनिवार्य करण्यात आली असून ती न केल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांचे व्यवहार थांबले आहेत. यामुळे तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.
हप्ता न मिळाल्यास काय कराल?
हप्ता न मिळाल्यास पोर्टलवर आपले बेनिफिशियरी स्टेट्स तपासावे आणि ई-केवायसी किंवा आधार लिंकची स्थिती पाहावी. काही त्रुटी असल्यास तहसील कार्यालय किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधून आपले रेकॉर्ड दुरुस्त करून घ्यावेत. तसेच हेल्पलाइन क्रमांकवर कॉल करूनही तक्रार नोंदवता येते.
यंदा कशामुळे झाला विलंब ?
यंदा लाभार्थी डेटाची सखोल पडताळणी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याच्या प्रक्रियेमुळे हप्ता मिळण्यास काहीसा विलंब झाला. तसेच, नवीन ‘अॅग्रिस्टॅक’ 3 प्रणालीमध्ये शेतकरी माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असल्याने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागला. यामुळे फेब्रुवारी ऐवजी मार्च महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे.
लाभार्थी असूनही ‘अॅग्रिस्टॅक’ नसणाऱ्यांकडे लक्ष
सरकार आता ‘अॅग्रिस्टॅक’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भर देत असून, ज्यांचे रेकॉर्ड यात डिजिटल स्वरूपात अपडेट नाहीत, त्यांना अडचणी येत आहेत. जमीन नॉर्दीचे अचूक डिजिटलायझेशन नसल्यामुळे काही शेतकऱ्यांची पात्रता असूनही लाभ थांबला आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता अशा लाभार्थ्यांच्या डेटा पडताळणीवर विशेष
लथ निले जान गाने