लिपीक, सहायक, अन्य विविध पदांची महारीट मध्ये सरकारी नोकरीची संधी – MahaReat Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MahaReat Bharti 2026 – There is good news for candidates currently seeking employment. Recruitment has commenced for various positions, including Clerk, Driver, and other roles. These positions also offer attractive salary packages. Let us, therefore, examine the full details regarding this opportunity under MahaReet Bharti 2026. A major recruitment drive has been announced for various vacant positions in Pune under the aegis of the Maharashtra State Innovative Research and Training Institute (MahaReat ). Through this recruitment process, appointments will primarily be made for key positions such as Assistant, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Senior Clerk, Junior Clerk, Clerk, Record Keeper, and Driver. This represents a golden opportunity for young individuals with higher education and a keen interest in the field of research, offering a prime chance to contribute to the development process of Maharashtra under this recruitment of MahaReat recruitment 2026.

MahaReet Bharti 2026

नोकरीच्या शोधात असेलल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या अंतगर्त लिपिक, चालक आणि अन्य पदासाठी भरती सुरु झाली आहे. यासतीच पगार सुद्धा चांगला मिळणार आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (MahaReat Job Vacancies) अंतर्गत पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे प्रामुख्याने य सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, अभिलेखापाल, वाहनचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आवड असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत योगदान देण्याची ही नामी संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असून, संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी कामाचा अनुभव आणि संगणकीय ज्ञान (विशेषतः MSCIT) अनिवार्य करण्यात आले आहे. वयोमर्यादेचा विचार करता, १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

MahaReet Bharti 2026

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुकांनी महा्रीटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. निवड प्रक्रिया प्रामुख्याने लेखी परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखतीवर आधारित असेल. गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. शेवटी, ही पदे कराराच्या स्वरूपातील असून सुरुवातीला ठराविक कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल, जी कामाच्या प्रगतीनुसार वाढवली जाऊ शकते. या भरतीमुळे पुण्यातील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपले अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया for MahaReet Bharti 2026

उमेदवारांची निवड प्रामुख्याने खालील टप्प्यांत केली जाईल:

  1. लेखी परीक्षा: पदाच्या स्वरूपानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका असू शकते.
  2. मुलाखत: परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  3. कौशल्य चाचणी: लिपीक किंवा तांत्रिक पदांसाठी टायपिंग किंवा संगणक चाचणी घेतली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत (Online Process)
  1. इच्छुक उमेदवारांनी MahaReet च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी.
  2. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
  3. आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करावीत.
  4. विहित परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
महत्त्वाच्या सूचना

महत्वाच्या टिप आणि माहिती  : –
१. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारानी नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टने, कुरीअर किंवा वैयक्तिक दि.१५/०५/२०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतील.
२. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही ११ महिन्यांच्या कालावधींकरिता असेल तद् नंतर उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधींकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिन्याची पुनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
३. अर्ज पाठवताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहावे.
४. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.

  • ही पदे पूर्णपणे कंत्राटी/ठराविक कालावधीसाठी असू शकतात.
  • अपूर्ण भरलेले अर्ज नाकारले जातील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत दिलेली अधिकृत जाहिरात नीट वाचूनच अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी mahareet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Important Links For mahareat.maharashtra.gov.in Job 2024

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/Y0i3L
✅ अधिकृत वेबसाईट
mahareat.maharashtra.gov.in

Leave a Comment