जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत १०३ रिक्त पदांची भरती सुरु ! Jilhadhikari Karyalay Akola Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे १०३ रिक्त पदांसाठी मेगा भरती २०२६; १७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी
अकोला (प्रतिनिधी): सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला (नगरपालिका प्रशासन शाखा) यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील तब्बल १०३ रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत शिपाई (२४ पदे), फायरमन रेस्क्यूअर (२२ पदे), कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक (१३ पदे), पंप ऑपरेटर (८ पदे), फिटर (६ पदे), वाहन चालक (५ पदे), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (५ पदे), फिल्टर ऑपरेटर (५ पदे), इलेक्ट्रिशियन (४ पदे), वायरमन (४ पदे), उद्यान पर्यवेक्षक (२ पदे), सहाय्यक ग्रंथपाल (२ पदे), व्हॉल्व्हमन (२ पदे) आणि लघु टंकलेखक (१ पद) अशा विविध गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड, पातूर नगरपरिषदा आणि बार्शीटाकळी नगरपंचायतीमध्ये ही नियुक्ती दिली जाणार असून, पदानुसार १० वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI) तसेच पदवीधर उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे.

Jilhadhikari Kayalaya akola Bharti 2026

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ₹१५,००० ते ₹८१,१०० पर्यंत आकर्षक मासिक वेतन दिले जाईल. या भरतीसाठी २६ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांनी १७ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) अकोला जिल्हा प्रशासनाच्या akola.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज आणि परीक्षा शुल्क (खुल्या प्रवर्गासाठी ₹१,०००, राखीव प्रवर्गासाठी ₹९०० आणि माजी सैनिकांसाठी ₹१०) ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, पदांचा तपशील आणि अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, सहायक ग्रंथपाल, गाळणी चालक जोडारी, वीजतंत्री, पंप ऑपरेटर / पंप चालक, तारतंत्री, वाहन चालक कमी अधिकारी, अग्निशामक विमोचक, शिपाई, व्हालमन
  • पद संख्या – 103 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – akola.gov.in

 

Leave a Comment