वसई-विरार शहर महानगरपालिकेत १५६ पदांसाठी मेगा भरती; १६ डिसेंबर नव्हे, तर १७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधीविरार (ता. वसई): सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘गट-क’ मधील तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील एकूण १५६ रिक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (भा.प्र.स.) यांनी ही भरती प्रक्रिया जाहीर केली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उद्यान निरीक्षक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, आरेखक , सर्वारह, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, लिपिक टायपिस्ट, सहाय्यक विधी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गाळणी निरीक्षक, फायर स्टेशन अधिकारी, उपअग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमिख अग्निशमन विमोचक
- पदसंख्या – 153 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग-1000/-
राखीव प्रवर्ग मगसवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक – 900/-
माजी सैनिक – 0/- - अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ डिसेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/
अर्ज करण्याचे वेळापत्रक आणि संकेतस्थळ
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आजपासून म्हणजेच २६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना १७ डिसेंबर २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील आणि परीक्षा शुल्कही भरता येईल.
- उमेदवारांनी केवळ महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पदनिहाय तपशील आणि वेतनश्रेणी
या भरतीमध्ये १८ विविध संवर्गांतील पदांचा समावेश असून, सर्वाधिक पदे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि लिपिक टंकलेखक या संवर्गातील आहेत:अ.क्र.पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी (७ व्या वेतन आयोगानुसार)
१ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)५०एस-१४ (₹ ३८,६०० – १,२२,८००)
२ लिपिक टंकलेखक५०एस-०६ (₹ १९,९०० – ६३,२००)
३ वीजतंत्री (Electrician)१०एस-०८ (₹ २५,५०० – ८१,१००)
४ प्रमुख अग्निशमन विमोचक१०एस-०८ (₹ २५,५०० – ८१,१००)
५ कनिष्ठ अभियंता (विद्युत)०७एस-१४ (₹ ३८,६०० – १,२२,८००)
६ आरेखक (Draftsman)०४एस-१० (₹ २९,२०० – ९२,३००)
७ सर्व्हेअर (Surveyor)०४एस-०८ (₹ २५,५०० – ८१,१००)
८ उप-अग्निशमन केंद्र अधिकारी०४एस-१३ (₹ ३५,४०० – १,१२,४००)
९ उद्यान निरीक्षक०३एस-१० (₹ २९,२०० – ९२,३००)
१० गाळणी निरीक्षक (Filter Inspector)०३एस-०६ (₹ १९,९०० – ६३,२००)
११ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)०२एस-१४ (₹ ३८,६०० – १,२२,८००)
१२ सहाय्यक रसायनतंत्रज्ञ०२एस-०६ (₹ १९,९०० – ६३,२००)
१३ अग्निशमन केंद्र अधिकारी०२एस-१४ (₹ ३८,६०० – १,२२,८००)
१४ सांख्यिकी अधिकारी०१एस-१५ (₹ ४१,८०० – १,३२,३००)
१५ सहाय्यक विधी अधिकारी०१एस-१४ (₹ ३८,६०० – १,२२,८००)
१६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ०१एस-१० (₹ २९,२०० – ९२,३००)
१७ आरोग्य / स्वच्छता निरीक्षक०१एस-०८ (₹ २५,५०० – ८१,१००)
१८ सहाय्यक ग्रंथपाल०१एस-०६ (₹ १९,९०० – ६३,२००)
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
१ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ४३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे (काही विशिष्ट पदांसाठी कमाल वयोमर्यादेत स्वतंत्र अटी लागू आहेत).परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी ₹ १,०००/-, तर राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक) उमेदवारांसाठी ₹ ९००/- शुल्क आकारले जाईल. माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचना
शासनाच्या निर्णयानुसार ‘गट-क’ मधील या पदांसाठी कोणतीही मौखिक परीक्षा (मुलाखत) घेतली जाणार नाही; उमेदवारांची निवड केवळ ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेच्या आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे होईल.परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) परीक्षेच्या किमान ७ दिवस आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि संगणक अर्हता (MS-CIT किंवा समकक्ष) धारण करणे अनिवार्य आहे.
- अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी टी.सी.एस. च्या +9152037219 या हेल्पलाइनवर किंवा महापालिकेच्या 0250-6630000 या क्रमांकावर संपर्क साधावा.
- सविस्तर पदनिहाय शैक्षणिक पात्रता, सामाजिक व समांतर आरक्षण आणि इतर अटी व शर्तींसाठी उमेदवारांनी www.vvcmc.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.