केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPFs) ‘सब-इन्स्पेक्टर’ पदांची मोठी भरती; १,१६७ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु BSF Bharti 2026 केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दल (BSF) व इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) कार्यरत असलेल्या जवानांसाठी पदोन्नतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बीएसएफ महासंचालनालयामार्फत २०२६ या वर्षासाठी ‘लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन’ (LDCE) द्वारे सब-इन्स्पेक्टर (GD) या १,१६७ पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येतील.

पदसंख्या आणि दलांनुसार तपशील:
या भरती मोहिमेंतर्गत BSF, CRPF, SSB आणि ITBP या चार दलांमधील कार्यरत कॉन्स्टेबल (GD/ट्रेड्समन), हेड कॉन्स्टेबल (GD) आणि ASI (GD) पदावरील पुरुष व महिला कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत. दलांनुसार रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

वेतनश्रेणी आणि महत्त्वाच्या अटी:
- वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना पे-मॅट्रिक्स लेव्हल-६ नुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये दरमहा वेतन आणि इतर शासकीय भत्ते मिळतील.
- सेवा आणि शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने प्रशिक्षणासह किमान ४ वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली असावी.
- तसेच मागील सेवाकाळातील नोंदी स्वच्छ (Clean Record) असणे व वैद्यकीय श्रेणी ‘SHAPE-I’ असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे असावे. अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप:
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाणार आहे:
१. पहिला टप्पा (संगणकाधारित लेखी परीक्षा – CBT): २०० गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची लेखी परीक्षा होईल. यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती (५० गुण), आकलन व संवाद कौशल्य (५० गुण), संख्यात्मक अभियोग्यता (५० गुण) आणि सामान्य ज्ञान व व्यावसायिक ज्ञान (५० गुण) या विषयांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी ३ तास ३० मिनिटांचा असेल. या परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ४५% आणि एकूण ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे (SC/ST उमेदवारांना ५% सवलत लागू).
२. दुसरा टप्पा (शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणी): लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी (PST), शारीरिक क्षमता चाचणी (PET – धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी घेतली जाईल. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नागपूर येथील सीआरपीएफ केंद्रासह देशभरातील ३० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र जवानांनी आपल्या संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि सेवा पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून बीएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://bsf.mha.gov.in) ३१ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीचे वाचन करावे किंवा ०११-२४३६४८५१/५२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.