महत्वाचे-आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळावा – CMYKPY Rojgar Melava 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

An excellent opportunity has arrived for educated youth seeking employment to enhance their skills and gain hands-on experience in a government department. The District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance Center, in collaboration with the Office of the Superintendent of Police (Rural), is organizing the ‘Chief Minister Yuva Karya Prashikshanti Rojgar Melava’ (CMYKPY Job Fair).

CMYKPY Rojgar Melava 2026 – नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना आपले कौशल्य वाढवण्याची आणि शासकीय विभागात कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलिस अधीक्षक (ग्रामीण) (Amravati CMYKPY Rojgar Melava 2026 Apply Online Now) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, ३० जून २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अमरावती ग्रामीण पोलिस विभागाच्या आस्थापनेंतर्गत ११ महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

CMYKPY Rojgar Melava 2026
हा मेळावा डेपो रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास केंद्रात आयोजित केला आहे. यासाठी वय किमान १८ ते ३५ वर्षे आणि शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार यासाठी पात्र नसतील. इच्छुक उमेदवारांनी ‘cmykpy’ संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, तसेच बँकखाते आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी ३० जून रोजी स्वतःच्या खर्चाने बायोडाटा, फोटो व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२१-२५६६०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभघ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Leave a Comment