Sangli Mahanagarpalika Bharti – SMKM stands for the Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Mukhyamantri – its also related to the new Yuva Karya Prashikshan Yojana, CMYKPY Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Bharti 2026 Application forms the claim that mega recruitment is going on for 586 vacant posts in Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporations went viral on social media. The municipal administration clarified that this content is untrue and misleading. The administration has said that no official recruitment process is going on at present. ‘Mega recruitment’ is going on for 586 vacant posts in Sangli, Miraj and Kupwad City Municipal Corporations. Such information is going viral on social media and websites. On this, the municipal administration has given a clarification that ‘No recruitment process is going on. That content is untrue and misleading.’.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 586 रिक्त पदांसाठी मेगाभरती सुरू असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला.महानगरपालिका प्रशासनाने हा मजकूर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले. सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये ५८६ रिक्त जागांसाठी ‘मेगाभरती’ सुरू आहे. याप्रकारची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावर व्हायरल होत आहे. यावर ‘कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नाही. तो मजकूर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा आहे.’ असे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ५८६ पदांसाठी भरती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत. महानगरपालिकेकडून सध्या कोणतीही सरळ सेवांची नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही. सध्या रिक्त पदांची संख्या १ हजार ४८० आहे. याशिवाय महापालिकेकडे बदली, रोजंदारी, मानधनी १ हजार २७२ कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिकेकडे कायम सेवेतील पदोन्नतीतील पदे ७८४ आहेत. त्यापैकी ५६४ पदे रिक्त आहेत. अशी माहिती आहे, हि भरतीची जाहिरात नाही! त्यामुळे कर्मचारी पदोन्नती व भरतीकडे लक्ष लागले आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी कोणतेही संशयास्पद किंवा सोशल मीडियावरील लिंक्सवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. भरतीबाबतच्या अधिकृत माहितीसाठी महानगरपालिका कार्यालयाशी किंवा संकेतस्थळाशी संपर्क साधा. महानगरपालिकेच्या नावाने पसरवल्या जाणाऱ्या या खोट्या जाहिरातींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
नागरिकांनीही अफवांना बळी पडू नये. जर भविष्यात भरती प्रक्रिया राबवण्यात आली, तर त्याची रितसर माहिती मुख्य प्रवाहात असलेल्या वर्तमानपत्रांमधून आणि अधिकृत माध्यमांतून दिली जाईल. नागरिकांनी आणि उमेदवारांनी अशा अफवा पसरवणारे मेसेज पुढे फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे. असे कळविले आहे.
या भरती जाहिराती आपल्या बरोबर आम्ही रोजगारवार्ता वर प्रकाशित करूच तेव्हा आम्हला या लिंक वरून जॉईन करून ठेवा,म्हणजे अपडेट्स वेळेवर मिळतील.
1. सांगली महापालिकेत 586 जागांची भरती सुरू आहे का?
नाही, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही.
2. व्हायरल झालेली जाहिरात खरी आहे का?
नाही, ती माहिती तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
3. प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिले?
कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
4. नोकरी शोधणाऱ्यांनी काय करावे?
अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती तपासावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
5. भविष्यात भरतीची माहिती कुठे मिळेल?
महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत जाहिरातीतूनच माहिती दिली जाईल.
Sangli Mahanagarpalika Bharti Details
Organization Name | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment Process 2026 (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) |
Name Posts (अपेक्षित पदाचे नाव) |
|
Number of Vacancies (एकूण पदसंख्या) | अजून जाहिरात आली नाही |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://smkc.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online Application Forms |
Job Location (नोकरी ठिकाण) | Hon. Assistant Commissioner. Sa. Q. V. Employee Recruitment/Promotion Cell Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporation names only Near Apta Police Post, Square Water Tank, First Floor Sangli. |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | Add will be live soon |

2 thoughts on “सावधान- महानगरपालिकेमध्ये फेक ‘मेगाभरती’; तब्बल ५८६ रिक्त जागांचा मेसेज व्हायरल!- Sangli Mahanagarpalika Bharti”
Ranjana Ashok Maske
Ha