आदिवासी आश्रमशाळेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी 416 रिक्त पदांची भरती! – ashram shala chowkidar bharti

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

Maharashtra ashram shala chowkidar bharti –  There is good news for candidates currently seeking employment. A significant opportunity for a government job has emerged—specifically for candidates who have passed the 10th grade! Let us take a look at the full details. The government has taken a major decision regarding the strengthening and security of government *Ashramshalas* (residential schools) operating under the Tribal Development Department of Maharashtra state; consequently, the process to fill 416 vacant positions for the post of ‘Chowkidar’ (Watchman) has been initiated under Maharashtra Ashram Shala Bharti. This recruitment drive presents a substantial employment opportunity for educated unemployed youth across the state, particularly for candidates hailing from tribal regions. The Department has indicated that, to ensure the entire selection process is conducted with complete transparency, an online examination will be administered through the renowned organization, TCS. Furthermore, the minimum educational qualification required for this recruitment is simply a 10th-grade pass.

ashram shala chowkidar bharti

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्यासही सरकारी नोकरीची मोठी संधी समोर अली आहे आणि ती पण फक्त १० वी पास उमेदवारांसाठी!! चला तर पूर्ण माहिती बघूया. महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांच्या बळकटीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून, ‘चौकीदार’ या पदाच्या रिक्त असलेल्या ४१६ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, विशेषतः आदिवासी भागातील उमेदवारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ही संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी TCS या नामांकित संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा फक्त १० वी पास आहे.  या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेच्या अटीनुसार, १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १५,००० ते ४७,६०० रुपये (S1 वेतनश्रेणी) या वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असून, प्रकल्पनिहाय रिक्त जागांची सविस्तर माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Post Details

  • पदाचे नाव – चौकीदार
  • पदसंख्या – 416 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
  • परीक्षा शुल्क –
    • अमागास रुपये १०००/-  / मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग – रुपये ९००/- (१० टक्के सुट)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे. अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये, तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. माजी सैनिकांना या शुल्कातून पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मे २०२६ असून, उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज पूर्ण माहितीसह सादर करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

नाशिक विभागासह राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयांतर्गत सध्या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर, ४१६ चौकीदारांची ही भरती शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भरती प्रक्रियेचा सविस्तर अभ्यासक्रम, अटी आणि शर्ती याबाबतची अधिक माहिती tribal.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

Leave a Comment