Nagar Parishad Bharti 2026 – Friends, a Important update regarding government employment in Maharashtra State has just emerged—specifically within your own district or local Municipal Council Also! The Directorate of Municipal Administration, Maharashtra, is set to launch a massive recruitment drive very soon. An official advertisement will be published for various district-level positions across Maharashtra under the Direct Service quota, aiming to fill a staggering 3,129 vacant posts. So, friends, if you are actively seeking a government job and are keen to work within the Municipal Council sector, this presents a golden opportunity for you. The actual recruitment process to fill the 3,138 vacancies projected for 2026 is scheduled to commence shortly. These vacancies span across the Konkan, Pune, Gadchiroli, Sambhajinagar, Nashik, Amravati, and Nagpur divisions. Furthermore and significantly since these positions are being filled through the district-level Direct Service quota, this offers a tremendous opportunity for local candidates to secure employment. According to the latest information available, the official recruitment advertisement is expected to be released within the next few days under Maharashtra Nagar Parishad Bharti 2026. Therefore, candidates are strongly advised not to wait for the official notification but to begin their preparation right away. Competition in Direct Service recruitment is typically intense; consequently, only timely and diligent preparation will pave the way for your success.
मित्रांनो, सरकारी नोकरी संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. तोही तुमच्याच जिल्ह्यात किंवा नगर नगरपरिषद मध्ये! महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत लवकरच एक मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सरळसेवा कोट्यातील महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरीय पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार असून यामध्ये तब्बल ३१२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि नगरपरिषद विभागात काम करण्यास इच्छुक असाल, तर ही तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. लवकरच २०२६ मध्ये रिक्त असलेली ३ हजार १३८ जागा भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या रिक्त जागांमध्ये कोकण, पुणे, गडचिरोली, संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर विभागांचा समावेश आहे. तसेच महत्वाचे म्हणजे ही पदे जिल्हास्तरीय सरळसेवा कोट्यातून भरली जाणार असल्याने, स्थानिक उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीची अधिकृत जाहिरात पुढील काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरातीची वाट न पाहता आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. सरळसेवा भरतीमध्ये स्पर्धा मोठी असते, त्यामुळे वेळेत केलेली तयारीच तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. आणि हो या भरतीचा अपडेट लगेच मिळवण्यासाठी या लिंक वरून आम्हला व्हॅट्सऍप वर जॉईन करा.

या नवीन पदभरतीद्वारे राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आस्थापनावरील गट-क व गट -ड च्या तीन हजार १३८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील उमेदवारांची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबविणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाने संकेत दिले आहेत. राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क व गट-ड ची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजात आहेत त्या कर्मचाऱ्यांवर बोजा वाढला आहे. रिक्त जागांच्या भरतीसाठी संबंधित नगर परिषद व नगरपंचायतींकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
या भरतीसाठी पात्रता आणि अटी (अपेक्षित) Nagar Parishad Bharti 2026 Eligibility
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असेल. साधारणपणे:
- गट क पदांसाठी: पदवीधर (Graduate) असणे आवश्यक असू शकते. काही तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयातील पदविका किंवा पदवी लागण्याची शक्यता आहे.
- गट ड पदांसाठी: १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील.
- वयोमर्यादा: शासनाच्या नियमानुसार १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी सवलत लागू).
बेरोजगारांना मिळेल संधी – राज्यातील या रिक्त पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना त्या त्या शहरातील बेरोजगार हातांना काम मिळेल. ही भरती दिलासादायक ठरणार आहे. तसेच संबंधित विभागातील रिक्त जागा भरल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर असलेला अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे. त्यासोबतच कामांना गती मिळणार आहे.