मोठी बातमी! तलाठी भरती जाहीर अर्ज सुरु, तब्बल 5707 जागांसाठी MPSC घेणार परीक्षा – MPSC Gram Mahsul Adhikari Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MPSC Gram Mahsul Adhikari Bharti 2026 – एमपीएससी मार्फत आता तलाठी भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गांसह एकूण 5707 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पदसंख्येतील बदल आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 2619 रिक्त पदे भरण्याकरीता 25 जूनला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा होणार होती. आता या परीक्षेमध्ये 1539 तलाठी पदांसाठी, तर राज्य तक्रार ग्राहक निवारण आयोगाच्या वरिष्ठ अभिलेख, वरिष्ठ लिपीकची 11 पदे यासह लिपीक, महसूल आणि आदिवासी वन विभागाच्या लिपीक टंकलेखकांची रिक्त पदे अशी एकुण 3088 पदांसाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी 5 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. तर, परीक्षा शुल्क 8 ऑगस्टपर्यंत भरावे लागणार आहे. या भरतीसाठींचा पदानिहाय तपशील पूर्वपरीक्षेच्या आधी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या संवर्गातील किती जागा आहेत ते आरक्षणाचे शुद्धपत्रक जाहीर झाल्यानंतर समजेल.

Gram Mahsul Adhikari Bharti 2026

Educational Qualification For Talathi Bharti 2026 

तलाठी भरतीसाठी आवश्यक शिक्षणी पात्रता खाली दिली आहे. For the recruitment of total 1539 posts in MPSC Gram Mahsul Adhikari – Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state under Gram Mahsul Adhikari Bharti 2026.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी  रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

 

MPSC ने प्रकाशित केलेल्या शुद्धिपत्रकात संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे सुधारित वेळापत्रक आणि तपशील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये तलाठी पदाचा समावेश आहे.

कार्यक्रमतारखा
मूळ जाहिरात प्रसिद्धीची तारीख२५ जून २०२६
शुद्धिपत्रक प्रसिद्धीची तारीख२२ जुलै २०२६
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.३१ जुलै २०२६
संयुक्त प्राथमिक परीक्षेची तारीख२५ ऑक्टोबर २०२६ (ऑफलाइन – OMR आधारित)
  • प्रश्नसंख्या व गुण: परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील, जे २०० गुणांसाठी असतील.
  • नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking): या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती असणार नाही, ज्यामुळे उमेदवारांना सर्व प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल.
  • वेळ व कालावधी: परीक्षा पूर्ण करण्यासाठी ०२ तासांचा (१२० मिनिटे) कालावधी दिला जाईल.
  • काठिण्यपातळी: प्रश्नपत्रिकेत मराठी विषयासाठी प्रश्नांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२वी) समकक्ष असेल, तर उर्वरित सर्व विषयांचे प्रश्न पदवी दर्जाच्या (Graduation Level) काठिण्यपातळीवर आधारित असतील.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात  https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

Leave a Comment