Rayat Shikshan Sanstha Bharti – Great news for job seekers! Rayat Shikshan Sanstha, Satara has officially released a recruitment notification to fill up various vacant positions. This is an excellent opportunity to work with one of the most prestigious educational networks in Maharashtra. The institution is inviting eligible candidates for multiple teaching and non-teaching roles. The selection will be done directly through a Walk-In-Interview under Rayat Shikshan Sanstha Bharti.
मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अत्यंत नामांकित आणि अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. या संस्थेची पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये या संस्थेची स्थापना केली. “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे वाक्य समोर ठेवून गरीब, कष्टकरी आणि बहुजन समाजातील मुला-मुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महान कार्य या संस्थेने केले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अविरतपणे सुरू आहेत. या प्रतिष्ठित संस्थेत काम करणे हे प्रत्येक शिक्षकाचे आणि कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. या नावाजलेल्या रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत पुणे विभागातील शाळा आणि महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता विविध पदांसाठी थेट मुलाखती (Walk-In-Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत. ही पदे तात्पुरत्या आणि हंगामी स्वरूपाची आहेत. हि नोकरीची ची जाहिराती आज म्हणजेच ५ जून २०२६ रोजी प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे!! चला तर या बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया बघूया. आणि हो मित्रांनो, नवीन नोकरी जाहिराती आणि महत्वाचे अधीकृत अपडेट्स, महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या
लिंक वरून व्हॉट्सअप चॅनल किंवा लिंक वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा !
तर नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांनो, रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच अधीक्षक, स्वयंपाकी आणि पहारेकरी अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदाच्या गरजेनुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संस्थेची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या जाहिरातीची लिंक आम्ही खाली दिली आहे. या भरतीमधील निवडक उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण सातारा हे असणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या (Walk-In-Interview) माध्यमातून केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह गुरुवार, ११ जून २०२६ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे-४११००७ हे आहे. या भरती संदर्भातील अधिकृत अटी, नियम आणि इतर सविस्तर तपशिलासाठी उमेदवारांनी संस्थेच्या http://rayatshikshan.edu/ या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्यावी किंवा खाली आम्ही सर्व लिंक आणि जाहिरात सुद्धा दिली आहे.

- पदाचा तपशील – पूर्व प्राथमिक / प्राथमिक / माध्यमिक शिक्षक, अधीक्षक, स्वयंपाकी क पहारेकरी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सातारा रयत संस्थान
- निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे-०७
- मुलाखतीची तारीख – 11 जून 2026
Important Links For rayatshikshan.edu Satara Application 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Vo15M |
| ✅ अधिकृत वेबसाईट | http://rayatshikshan.edu/ |