Pashusavardhan Vibhag Bharti – Friends, currently, there is a mega recruitment of 70 thousand in Maharashtra under Pashusavardhan Vibhag Bharti. Under this, the recruitment process of various departments will be implemented. Due to this, there is an atmosphere of joy among the candidates in Maharashtra. Now the Animal Husbandry Department has been added to this. Mega recruitment of 2795 posts will be done in this department soon. The new circular for this has been announced now Pashudhan Vibhag Bharti 2026. The advertisement for this recruitment has not been published yet but it is understood that it will be published soon. In Amravati district, only 48 posts of Livestock Development Officer have been filled and 110 posts are vacant. Similarly, 15 posts of Assistant Commissioner are vacant. Is the situation similar in other districts including Amravati and when will the vacant posts be filled? This question was raised by MLA Sanjay Khodke in the budget session of the legislature today. According to the reorganization of Livestock Development Officers in Amravati district, 158 posts have been approved in the district. Out of 158 posts, only 48 posts have been filled. That is, the posts of 110 Livestock Development Officers are vacant. In Achalpur taluka alone, 20 to 22 posts of Livestock Development Officers are vacant Pashusavardhan vibhag bharti 2026 pdf Download Link. Also, about 31 posts of Assistant Commissioners have been approved, out of which 16 posts are filled, while 15 posts are vacant under पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 महाराष्ट्र भरती.
मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात ७० हजार मेगाभरतीच वारे सुरु आहे. या अंतर्गत विविध विभागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मुळे महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यातच आता पशुसंवर्धन विभागाची भर पडली आहे. या विभागात लवकरच २७९५ पदांची मेगा भरती होणार आहे. याचे नवीन परिपत्रक सध्या जाहीर झाले आहे. अजून या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली नाही परंतु लवकरच प्रकाशित होणार असल्याचे समजते. तसेच सध्या प्राप्त नवीन माहित नुसार, अमरावती जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्याची केवळ ४८ पदे भरलेली असून ११० पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सहायक आयुक्तांची १५ पदे रिक्त आहेत. अमरावतीसह अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच स्थिती असून रिक्त पदे केव्हा भरण्यात येणार आहेत? असा सवाल आमदार संजय खोडके यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. अमरावती जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात १५८ पदे मंजूर आहेत. १५८ पदांपैकी केवळ ४८ पदे भरलेली आहेत. म्हणजेच ११० पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकट्या अचलपूर तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची २० ते २२ पदे रिक्त आहेत. तसेच सहायक आयुक्तांची जवळपास ३१ पदे मंजूर असून त्यातील १६ पदे भरलेली आहेत, तर १५ पदे रिक्त आहेत. तसेच हि २ हजार पेक्षा जास्त जागांची नवीन भरती लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भात काही प्रश्न असल्यास आपण खाली कमेंट मध्ये विचारू शकता. या भरती जाहिराती आपल्या बरोबर आम्ही रोजगारवार्ता वर प्रकाशित करूच तेव्हा आम्हाला या लिंक वरून जॉईन करून ठेवा,म्हणजे अपडेट्स वेळेवर मिळतील.

पद मंजूर Vs भरलेली रिक्त
- पशुधन विकास अधिकारी ११ ०७ ०४
- सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०२ ०२ ००
- पशुधन पर्यवेक्षक १४ ०६ ०५
- वर्णोपचारक ०८ ०३ ०५
- परिचर ३१ ०४ २७
- अर्धवेळ सफाई कर्मचारी ०१ ०१ ००
- एकूण ६४ २३ ४१
Pashusavardhan Bharti Post Details
Following are the Pashusavardhan Bharti Post Details about Various Vacancies like pashu Dhan Adhikari Bharti process 2026. There are approximate 2795 Vacancies will be filled under this Bharti 2026. These vacancies are expected tobe filled soon in this quarter of 2026 year. As per the news source the starting date of Pashusavardhan Vibhga bharti is in April 2026. So will keep addin Latest Updates about this Bharti on RojgarVarta.in
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ | 2795 Vacancies |
| Total | 2795 Vacancies |
AHD Maharashtra PashuSavardhan Vibhag Bharti Details
तसेच मित्रांनो, या भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचा समावेश असेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि एक दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण 50 गुणांची असेल आणि मुलाखतही 50 गुणांची असेल. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दोन्ही टप्प्यात किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
शासनाच्या वतीने महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा अंतर्गत २,७९५ पदांच्या महाभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे हि भरती AHD Maharashtra Bharti 2026 अंतर्गत राबविण्यात येणार आहे. तर ३०८ पदे सहायक आयुक्त ‘अ’ वर्ग पदाचे सुद्धा भरती घेण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु संपूर्ण पदभरतीच्या प्रक्रियेला अजून एकवर्षाचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसंदर्भात योग्य कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी संपूर्ण राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची जास्त पदे आहेत व काही जिल्ह्यांमध्ये कमी पदे आहेत, त्यामध्ये फेररचना करणार का?, असा प्रश्न आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी सभागृहात सांगितले की, राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पदभरतीसंदर्भात वर्ष २०२४ मध्ये आकृतिबंध तयार करण्यात आला असून पदांच्या काही संवर्गामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून २५ एप्रिल २०२५ रोजी पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट ‘अ’ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तसेच १२ ऑगस्ट २०२५ रोजी ३०८ सहायक आयुक्त पदाची सुद्धा जाहिरात काढली आहे. तसेच पेपर सेट करण्यासाठी काही प्रोफेसरची निवड करावी लागत असल्याचे एमपीएससीमार्फत कळविण्यात आल्याने गेल्या २५ ऑक्टोबरपर्यंत याबाबतची पूर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनापर्यंत यातील बऱ्याच गोष्टी मार्गी लागणार असल्याचे उत्तर दिले. तसेच पशू पर्यवेक्षकांची पदे जिल्हा परिषदेने भरावयाची असल्याने याबाबतसुद्धा सामान्य प्रशासन विभागासोबत बोलणे झाले असल्याचे सभागृहात उत्तरादाखल सांगितले.