Nashik Mahanagar Palika Response Sheet PDF – मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे, नाशिक महानगरपालिका यांच्यामार्फत अभियांत्रिकी तसेच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील विविध पदांची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी दिनांक २४ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे. या परीक्षेची उत्तरतालिका अनेक उमेदवार शोधत आहे. या परीक्षेची उत्तरतालिका किंवा रिस्पॉन्स शीट नाशिक महानगर पालिका द्वारे उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध होणार आहे. सदर परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्यांच्या Login ID वर प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Response Sheet) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हि उत्तरतालिका आपण लवकरच डाउनलोड करू शकाल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेटसाठी या लिंक वरून आमच्या व्हॅट्सऍप चॅनलला जॉईन करा.

तसेच ज्या उमेदवारांना त्यांच्या दिलेल्या पेपरमधील कोणत्याही प्रश्नाबाबत हरकत नोंदवायची असल्यास, त्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. सर्व टप्पे आपण काळजीपूर्वक वाचावे.
१) उमेदवारांनी त्यांच्या Login ID वर दिनांक २६/०२/२०२६ ते ०१/०३/२०२६ या कालावधीत लॉगिन करावे.
२) संबंधित प्रश्न निवडून ऑनलाईन हरकत नोंदवावी.
३) प्रत्येक प्रश्नासाठी रु. १००/- (शंभर रुपये) शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
४) नमूद कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही.
५) हरकत नोंदविताना आवश्यक पुरावे/संदर्भ अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.