मिहान नागपूर येथे सुरक्षा व्यवस्थापक पदांची भरती सुरु, नोकरीची मोठी संधी! – MIHAN Nagpur Bharti 2026

शेयर करा आपल्या मित्रांना 👉

Table of Contents

MIHAN Nagpur Bharti 2026 – MIHAN India Ltd, Airport Nagpur, invites Application from eligible candidates for the post of SAFETY MANAGER on 12 Months Contractual basis at Nagpur Airport. The Application containing, Detailed Resume along with the copies of candidates should reach in hard copies on or before 30/03/2026 on following address. This recruitment is on a 12-month contract basis and is for Nagpur Airport. Interested candidates are required to submit their detailed bio-data and copies of necessary documents in hard copy to the given address on or before 30th March 2026. The selected candidate for this post will be paid a consolidated salary of Rs. 1,10,000/- per month.

मित्रांनो, सध्या मिहान नागपूर येथे अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होत आहे. या मुळे विदर्भातील अनेक उमेदवारांना रोजगार मिळत आहे. यातच एक मोठा अँड आज समोर आला आहे. खुद्द मिहान चा विभागात सुद्धा आता पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. आजचा  MIHAN इंडिया लिमिटेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे ‘सुरक्षा व्यवस्थापक’ (Safety Manager) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती १२ महिन्यांच्या करारावर आधारित असून नागपूर विमानतळासाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह शवतची तारीख ३० मार्च २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष (Hard Copy) अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १,१०,०००/- रुपये एकत्रित वेतन दिले जाईल.

MIHAN Nagpur Bharti 2026

पदाचा तपशील आणि पात्रता

  • पदाचे नाव: सुरक्षा व्यवस्थापक (Safety Manager).
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

आवश्यक प्रमाणपत्रे:

  • SMS, Annexure 14, 16 आणि 19 (ICAO/ACI/IATA कडून) प्रमाणपत्र.
  • किमान ५ दिवसांचा SMS कोर्स पूर्ण केलेला असावा (जानेवारी २०२३ नंतरचा नसावा).
  • मानवी घटक सुरक्षा प्रशिक्षण (Human factor safety training).
  • अपघात आणि घटना तपासणी प्रशिक्षण.

अनुभव:

  • किमान १० वर्षांचा विमान वाहतूक क्षेत्रातील (Aviation) अनुभव.
  • यापैकी किमान २ वर्षे भारतातील कोणत्याही परवानाधारक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षा विभागात कामाचा अनुभव अनिवार्य आहे.
  • DGCA CARS नुसार विमानतळ ऑपरेटर SMS लागू करण्याचा अनुभव असावा.

कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या

  • विमानतळावर सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (SMS) लागू करणे आणि तिचे निरीक्षण करणे.
  • DGCA, AAIB, BCAS आणि इतर संबंधित संस्थांशी समन्वय साधणे.
  • नियमित सुरक्षा ऑडिट आणि तपासणी करणे.
  • अपघात किंवा घटनांची चौकशी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवणे.
  • विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा जागरूकता मोहिमा आणि कार्यशाळा आयोजित करणे.

महत्वाच्या अटी आणि वेतन

  • मानधन: १,१०,०००/- रुपये प्रति महिना (सर्व भत्त्यांसह).
  • कराराचा कालावधी: १२ महिने.
  • करार संपुष्टात आणणे: कोणत्याही बाजूने २ महिन्यांची नोटीस देऊन करार संपवता येईल.

अर्ज कोठे आणि कसा करावा?

उमेदवारांनी आपला अर्ज आणि कागदपत्रे खालील पत्त्यावर ३०/०३/२०२६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत:

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मिहान इंडिया लिमिटेड (MIHAN India Ltd), 

पहिली मजला, जुनी टर्मिनल इमारत,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर - ४४० ००५ (महाराष्ट्र).

पूर्ण जाहिरात लिंक - https://shorturl.at/XJ4HK

Leave a Comment