Nagar Parishad Bharti 2026 & Nagar Panchayat Bharti 2026 – There is good news for the candidates looking for jobs in Maharashtra. A major recruitment process for more than 3 thousand posts is going to start in various Nagar Parishad Bharti 2026 and Nagar Panchayat Bharti in Maharashtra. Under this recruitment, 2151 posts of Group D will be recruited, as well as 987 posts of Group C will be recruited. This new advertisement is a great golden opportunity for 10th, 12th and graduate candidates. The full advertisement of this recruitment is yet to be published, but this recruitment will start next month in March-April 2026 under Maharashtra Nagar Parishad Bharti 2026.
To get complete information about this, join our WhatsApp channel from this link so that we will send you the PDF advertisement as soon as it is available. Currently, the government has selected TCS ION (Tata Consultancy Services Limited) and IBPS (Institute of Banking Personnel Selection) to fill the posts under the nomination quota in Group B (Non-Gazetted), Group C and Group D cadres under the Secondary Service Selection Boards through direct service through competitive examination process. It has been stated that all the District Collectors should select one of the two companies at their levels.
महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये ३ हजार पेक्षा जास्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती अंतर्गत गट ड (Group D Recruitment 2025) च्या २१५१ पदांची भरती होणार आहे, तसेच गट क (Group C) च्या ९८७ जागांसाठी भरती राबविण्यात येणार आहे. हि नवीन जाहिरात म्हणजे १० वी, १२ वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधीच राहणार आहे. अजून या भरतीची पूर्ण जाहिराती प्रकाशित व्ह्ययची आहे, परंतु पुढील महिन्यात मार्च- एप्रिल २०२६ मध्ये हि भरती सुरु होणार आहे. या बद्दलची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा म्हणजे PDF जाहिराती आल्याबरोबर आम्ही आपल्याया पाठवू. सध्या दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS ION -(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरांवर दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद केले आहे. सरळ सेवेद्वारे गट क व गट डच्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सरळसेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी याबाबत आढावा बैठक होणार आहे. या भरती जाहिराती आपल्या बरोबर आम्ही रोजगारवार्ता वर प्रकाशित करूच तेव्हा आम्हला या लिंक वरून जॉईन करून ठेवा,म्हणजे अपडेट्स वेळेवर मिळतील.

तसेच मित्रांनो, सद्य स्थिती नुसार, राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आस्थापनावरील गट-क व गट -ड च्या ३ हजार १३८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील उमेदवारांची भरती प्रक्रिया लवकरच शासन राबविणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे शासनाने संकेत दिले आहेत. राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क व गट-डची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजात आहेत त्या कर्मचाऱ्यांवर बोजा वाढला आहे. रिक्त जागांच्या भरतीसाठी संबंधित नगर परिषद व नगरपंचायतींकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच २०२६ मध्ये रिक्त असलेली ३ हजार १३८ जागा भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या रिक्त जागांमध्ये कोकण, पुणे, गडचिरोली, संभाजीनगर, नाशिक, अमरावती व नागपूर विभागांचा समावेश आहे. बेरोजगारांना मिळेल संधी राज्यातील या रिक्त पदांच्या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना त्या त्या शहरातील बेरोजगार हातांना काम मिळेल. ही भरती दिलासादायक ठरणार आहे. तसेच संबंधित विभागातील रिक्त जागा भरल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर असलेला अतिरिक्त कार्यभार कमी होणार आहे. त्यासोबतच कामांना गती मिळणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे?
मित्रांनो, खालील पदांसाठी पुढील भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. याची शैक्षणिक पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
- लिपिक (Clerk)
- कर निरीक्षक (Tax Inspector)
- संगणक ऑपरेटर
- अभियंता (Civil/Mechanical)
- आरोग्य निरीक्षक
- मल्टी टास्किंग स्टाफ
- 10वी / 12वी पास – शिपाई, सफाई कर्मचारी
- ITI / Diploma – तांत्रिक पदे
- Graduate / Degree – लिपिक, अभियंता, निरीक्षक
Educational Qualification For Nagar Parishad Recruitment 2026
पात्रता आणि अटी Nagar Parishad Bharti 2026
मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असेल. साधारणपणे:
१. गट क पदांसाठी: पदवीधर (Graduate) असणे आवश्यक असू शकते. काही तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयातील पदविका किंवा पदवी लागण्याची शक्यता आहे.
२. गट ड पदांसाठी: १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील.
३. वयोमर्यादा: शासनाच्या नियमानुसार १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गासाठी सवलत लागू).
यात काहीपण बदल असल्यास आम्ही अपडेट करूच.
Following are Post wise Educational Details for the Nagar parishad Bharti process 2026. Under this recruitment process Maharashtra Sarkar will cunduct Recruitment drive for the Post of Engineers, Accountant, Fire Officer, Sanitizing officer, Clerk, Typist, Steno & Many more posts.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| स्थापत्य अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| विद्युत अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| संगणक अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| लेखापाल/ लेखापरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | i. मान्यताप्राप्त पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण |
| अग्निशमन अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
| स्वच्छता निरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |

तसेच या नवीन नगर परिषद पदभरतीसाठी सेवानिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेवून, आवश्यकता असल्यास, सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल. अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल. संबधित उमेदवारास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक, वेळ व परीक्षा केद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राव्दारे उपलब्ध होईल.

या भरती साठी आवश्यक कागदपत्रांची यादी
मित्रांनो, अर्ज करताना किंवा दस्तऐवज पडताळणीवेळी खालील कागदपत्रे लागण्याची शक्यता असते. या पद्धतीला DV म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं म्हणतात.
- 10वी / 12वी गुणपत्रक
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- सही (Signature)
तर या भरतीसाठी वरील यादीतील सर्व कागदपत्रे स्कॅन करून आधीच तयार ठेवा, त्यामुळे अर्ज करताना आपला वेळ वाया जाणार नाही.
6 thoughts on “लागा तयारीला-नगर परिषद मध्ये ३१३८ पदांची मोठी पदभरती जाहीर! – Nagar Parishad Bharti 2026”
सर माझ्याकडे केंद्र सरकारच्या विविध विभागातील येणाऱ्या जाहिराती बद्दल माहिती उपलब्ध असते,त्यावर तुमची परवानगी असेल तर मी माहिती द्यायला तयार आहे.
Graduation
12th pass
I’m interested
Hey my education is 12th pass
Good information thanks