Dharmaday Ayuktalay Bharti 2026 – The Charity Commissioner Department (Dharmaday Ayuktalay Bharti 2026) is a vital wing of the Maharashtra State Government. However, due to the lack of major recruitment drives over the past several years, the number of vacant positions has increased significantly. To address this, the State Government is set to initiate a new recruitment process this year. This move aims to reduce the current work pressure on existing staff while providing employment opportunities to thousands of aspiring candidates. Dharmaday Ayuktalay Bharti 2026 Advertisement PDF will be available soon on this website.
धर्मादाय आयुक्त विभाग हा महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा विभाग आहे. या विभागता मागील जाहीर वर्षांपासून मोठी पदभरती झाली नाही. त्या मुळे रिक्त पदांचा आकडा चांगला फुगला आहे. त्यामुळे या वर्षी राज्य शासन या विभागात नवीन पदभरती प्रक्रिया सुरु करणार आहे. ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल सोबतच हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सार्वजनिक न्यास आणि चॅरिटेबल संस्थांचे नियमन, देखरेख व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्मदाय आयुक्तालयात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभरातील १,४७६ पैकी तब्बल ६२८ पदे रिक्त असल्याने कामकाजावर ताण वाढला आहे. नाशिक विभागातही मंजूर १३१ पदांपैकी ७७ पदे रिक्त असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे. धर्मादाय आयुक्तालयातर्फे सार्वजनिक न्यास, ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांची नोंदणी, वार्षिक लेखापरीक्षण, संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख, विश्वस्त बदल, मालमत्ता व्यवस्थापन; तसेच गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात. राज्यभरात धर्मादाय संस्थांची संख्या वाढत असताना त्यानुसार मनुष्यबळ न वाढल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्या मुळे हि प्रक्रिया आता येत्या काही दिवसात सुरु होणार असल्याचे समजते. या भरतीची अधिकृत जाहिरात सजून जाहीर झाली नसली तरी नवीन जाहिरात लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे.

मित्रांनो, या धर्मदाय आयुक्तालयात विभागता पदाचा आकडा मोठं आहे. यात गट-अ पासून गट-ड पर्यंत विविध स्तरांवर रिक्त पदे आहेत. विशेषतः सहाय्यक धर्मादाय आयुक्त, धर्मादाय निरीक्षक, लिपिकीय कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी, संस्थांची नोंदणी, वार्षिक अहवाल तपासणी, बदल प्रस्ताव, मालमत्ता नोंदी व तक्रारींची चौकशी यांसारखी कामे प्रलंबित राहत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे संस्थांच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. या रिक पदाची संख्या सुद्धा मोठी आहे. त्या मुले भारी मध्ये अनेक उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळती हे मात्र नक्की.

विभागातील पदांची स्थिती
नाशिक विभागात १३१ पदे मंजूर आहेत. त्यात ५४ पदे भरलेली, तर ७७पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ५४ पदांना मान्यता मिळाली. त्यापैकी ४१ पदे भरलेली, तर १३ पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यात २८ मंजूर पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. जळगावात ३३ पैकी १५ पदे रिक्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यात १६ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.